कत्तली करिता नेणाऱ्या जनावरां ची गाडी पोलीसा नी पकडली
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
कत्तली करिता 56 नग गोवंश सोबत 2 बोलेरो पिकअप सह एकुण किंमती 11,68,000/- रु चा माल पोलिसांनी केला जप्त. सालेकसा तालुका प्रतिनिधी
✍️दिनेश मानकर✍️
मो. 9637 984 105
सालेकसा:-
सालेकसा पोलीस स्टेशन पासून 17 किलोमीटर दूर कवडी जंगल परिसरात नमुद घटना दि.17/12/2024 चे 01/36 वाजे दरम्यान यातील फिर्यादी पो. स्टाफ सह पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली की, मौजा कवडी जंगल परीसरांत गोवंश जातीचे लहाण मोठी अशी जनावरांना एकमेकांना दोरीने दाटीवाटीने एकमेकांना ईजा होईल अशा रितीने अवैधरित्या वाहतुक करणार आहेत अश्या माहितीच्या आधारे फिर्यादी पो. स्टाफ व पंचासह सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता त्याठिकाणी दोन महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. 1) MH 36 AA 3498 2) MH 40 CD 4906 प्रत्येकी किंमती अंदाजे 5,00,000/- रू. प्रमाणे असा एकुण 10,00,000/- रू. व बाजुच्या जंगल परीसरात व वरील वाहनामध्ये गोवंश जातीचे लाल, पांढया, काळ्या रंगाचे असे एकुण 56 नग लहान मोठे गोवंश जातीचे जनावरे एकुण किंमती 1,68,000/- रू. असे एकुण किंमती 11,68,000/- रू चा माल जनावरे दोरीने दाटीवाटीने एकमेकांना ईजा होईल अश्या रितीने व चारा पाण्याची कोणत्याही प्रकारची व्यवस्था न करून अवैधरित्या कत्तलीकरीता निर्दयतेने, वाहतुक करण्याचे उददेशाने मिळुन आल्याने यातील फिर्यादिचे लेखी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे. फिर्यादी – पो.शि. रामप्रसाद तिलकचंद मेंढके बं.क्र. 2208 वय 42 वर्षे पोलीस स्टेशन सालेकसा यांच्या तक्रारी वरून आरोपी- 1) आकाश श्रीराम गायधने वय 24 वर्षे रा. सिल्ली, ता.जि. भंडारा 2) मारोती कवडु गभने वय 26 वर्षे रा. सिल्ली, ता.जि. भंडारा व 3) विजय मांगीलाल हटीले वय 36 वर्षे रा.पानगाव ता. सालेकसा जि. गोंदिया यांच्या वर अप क्र. 454/2024 कलम-5 (अ) (1), 5 (अ) (2), 6,9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, 1976 सहकलम 11(1) (ड) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतीबंध कायदा 1960. च्या अन्यवये गुन्हा दाखल केला गेला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोंदिया मा.गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, डी.वाय.एस.पी प्रमोद मडामे, आमगाव पोलिस उप विभाग यांचे निर्देश मार्गदर्शनाखाली सालेकसा पोलीस निरीक्षक भूषण बुराडे यांचे मार्गदर्शनात पो. हवा. डोंगरे, पो.शि अजय इंगळे, विकास वेदक, रामप्रसाद मेंढके यांनी केले आहे.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space