जल.साधारण विभागाल लागले ग्रहण
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
जलसंधारण कार्यालय येथे पदाला लागले ग्रहण
41 ग्राम पंचायत चा कार्यभार सांभाळतात पाच कर्मचारी
सालेकसा तालुका प्रतिनिधि पत्रकार
✍️दिनेश मानकर✍️
मो. 9637 984 105
सालेकसा:-
शासकीय . जलसंधारण कार्यालय आमगाव तालुका व सालेकसा तालुक्यात मिळून एक. शासकीय कार्यालय सालेकसा ला कार्यरत आहे परंतु आजही गेल्या दहा वर्षापासून आजही रिक्त पदामुळे शासकीय कामे खोडमलेली असतात यामध्ये आधीच सालेकसा तालुक्यात 41 ग्रामपंचायतच्या समावेश असून 92 गावांच् कार्यभार आहे यात जवळपास शासकीय कार्यालय हे एकमेव कार्यालय असून आमगाव तालुक्यात सुद्धा 57 ग्रामपंचायतच् समावेश असून जवळपास 83.च्या वर गावे मोडत आहेत . असे एकूण 175.च्या वर गाव असून दोन्ही तालुक्यातील कामाचे ताण अधिक असल्यामुळे वेळेवर काम होत नाही विशेष म्हणजे साले कसा शासकीय जलसंधारण कार्यालय येथे 17 पैकी फक्त पाच कर्मचारी कार्यरत आहेत उर्वरित 12 कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने याकडे शासन प्रशासन व जनलोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत जर महाराष्ट्रात 288 आमदार काम पाहतात तर शासकीय कार्यालयात शासनाचे कर्मचारी पदभरती रत्या करत नाही जर लोकशाहीमध्ये पाच पाच वर्षांनी निवडणुका होतात तर पाच वर्षांनी सुद्धा शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची ही लोकशाही प्रमाणे पद भरती होणे गरजेचे आहे असा संतप्त सवाल जनतेकडून केला जात आहे जलसंधारण कार्यालय मार्फत विविध विकास कामे केले जातात जसे गाव तलाव दुरुस्ती भूसंपादनाची कामे खोलीकरण तलाव बोडी गाळ काढणे जलयुक्त शिवार अभियानाचे कामे करणे व उपयुक्त असणारे तलाव यांची सुद्धा साफसफाई करणे व शेतकऱ्यांना तसेच वन्यप्राण्या प्राण्यांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते यांच्यासह विविध कामे या कार्यालयामार्फत केली जातात. जलसंधारण अधिकारी यांना विविध कामे असतात यात बैठका बैठकांना ज्यांनी जलसंधारण विभागाचे कामे सुरू असताना भेटी देणे शासकीय कार्यालयाच्या मिटींगला उपस्थित राहणे व असे विविध कामे सुद्धा याच अधिकाऱ्यांना करावे लागत असतात कनिष्ठ अभियंताचे . स्थापत्य पद ड्रायव्हर कनिष्ठ लिपिक परिचर उपविभागीय जलसंधारण अधिकारी सुद्धा रिक्त आहेत आधीच शासनाने पाच दिवसाच्या आठवडा केल्याने यात सुद्धा बऱ्याच कर्मचाऱ्यांना कामे शनिवार रविवारला सुद्धा करावी लागत असतात सदर जलसंधारण कार्यालयातील शासन प्रशासन जन लोकप्रतिनिधी यांनी तातडीने कार्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे
प्रतिक्रिया
यासंदर्भात प्रत्यक्षात अधिक माहिती घेतली असता मी जेव्हापासून या कार्यालयात, मी रुजू झालो त्यापूर्वीच बरेच पद रिक्त असल्याची माहिती आहे व मी शासन प्रशासनाकडे रिक्त पदाची मागणी करिता शासन दरबारी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु आतापर्यंत एकही कर्मचारी देण्यात आले नाही त्यामुळे कुठेतरी कामे करताना फार मोठी अडचण निर्माण होत असते त्यासाठी शासनाने त्वरित पद भरती करण्यात यावी जेणेकरून काम करणे अधिक सोयीचे होणार
पी.डी मडावी. उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालय सालेकसा
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space