स्मार्ट ग्राम तिरखेडी येथे जिल्हास्तरीय पुरस्कार तपासणी कार्यक्रम संपन्न
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*स्मार्टग्राम तिरखेडी येथे जिल्हास्तरीय स्मार्टग्राम पुरस्कार तपासणी कार्यक्रम संपन्न*
सालेकसा तालुका प्रतिनिधि
✍️✍️दिनेश मानकर✍️✍️
मोबाइल नंबर 9637 984 105
सालेकसा—
सालेकसा अंतर्गत तीरखेडी ०३ मार्च २०२५ रोजी स्मार्टग्राम तीरखेडी येथे आर.आर.पाटील स्वच्छ व सुंदर गाव जिल्हास्तरीय पुरस्कारसाठी जिल्हा परिषद गोंदिया चे वतीने अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी लोखंडे साहेब व उपमुख्यकार्यपालन अधिकारी वासनिक साहेब यांच्या पथकाद्वारे तपासणी करण्यात आली.
तपासणी कार्यक्रमाच्या सुरवातीला सरपंच प्रिया मनोज शरणागत व ग्रामपंचायत अधिकारी मेश्राम मेडम सोबत सर्व पदाधिकारी व गावकर्यांनी प्रवेशद्वारापुढे सर्व अधिकाऱ्यांचे जंगी स्वागत केले. यापुर्वी नुकतेच तीरखेडी ग्राम पंचायतीने सालेकसा तालुका प्रथम स्मार्टग्राम पुरस्कार पटकाविले आहे. संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील स्मार्ट पुरस्कारासाठी भाग घेतलेल्या एकूण सर्व ०८ ग्राम पंचायतीची ह्या जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी तपासणी करण्यात आली. याप्रसगी तीरखेडी येथे सर्वत्र स्वच्छता, रांगोळी स्वागत व्यवस्था करण्यात आली होती. तीरखेडी येथे स्वच्छता,पाणी संवर्धन,वृक्ष लागवट,पायाभूत डीजीटल शिक्षण,आरोग्य व्यवस्था अश्या अनेक सर्व घटकांवर प्रशंसनीय कार्य करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या प्रसंगी गटविकास अधिकारी मा. संजय पुरी साहेब, विस्तार अधिकारी मा. मुनेस्वर साहेब, जी प सदस्य विमल बबलू कटरे, सर्व ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील राजेंद्रजी पटले, तंटामुक्त अध्यक्ष कृष्णाजी पटले, मुख्याध्यापक जाधव सर व सर्व शिक्षक, विजयजी कटरे, राजेशजी खोब्रागडे, आरोग्य कर्मचारी डा शेंडे सर, गेडाम मेडम, सर्व आंगणवाडी सेविका, सर्व महिला बचतगट, सुनीलजी पटले,माजी सरपंच योगेश कटरे, गजानजी कटरे,योगेशजी फुंडे, सचिनजी कोल्हे, सोमकारजी मडावी, हिरालालजी उईके, जयलालजी पारधी, माजी ग्रामसेवक राणे साहेब,तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व ग्राम पंचायत सदस्य,कर्मचारी तसेच तीरखेडी येथील सर्व मान्यवर गावकरी यांनी परिश्रम घेतले तसेच कार्यक्रमाचे संचालन राठोड सbर तर आभार पर्यावरण दूत मनोज शरणागत यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space

